मुंबई – टीव्ही जगतात सर्वाधिक टीआरपी असलेला शो म्हणून हिंदी ‘बिग बॉस’कडे पाहिले जाते. अभिनेता सलमान खान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतो. सध्याचा ‘बिग बॉस 16’चा सिझन पहिल्याच दिवसापासून वादळी ठरत आला होता. यंदाचा सीजन अनेक कारणांमुळे चर्चेत ठरला आहे. घरातील भांडण असो व स्पर्धकांमधील मैत्रीचं नातं हे सगळंच प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन करत आहे. दरम्यान, 19 आठवड्यांच्या दीर्घ पर्वाला काल नवा विजेता मिळाला आहे.
शिव ठाकरे, प्रियंका चाहर चौधरी, एमसी स्टॅन, अर्चना गौतम आणि शालीन भनोट या टॉप 5 स्पर्धकांमध्ये बिग बॉस 16 चा महाअंतिम सोहळा रंगला. फिनाले सुरू होताच काहीच तासात आधी शालीन आणि त्यानंतर अर्चना घराबाहेर पडले. त्यानंतर विजेतेपदाचा महत्त्वाचा दावेदार असणाऱ्या प्रियंकाला घराबाहेर जावे लागले. ती विजेता होईल असे लाखो चाहत्यांना वाटत होते.
मात्र बिग बॉसच्या ट्रॉफीवर वेगळ्याच स्पर्धकाचं नाव लिहिलं होतं. फायनलमध्ये शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे दोघेजण होते. वोट सर्वात जास्त मिळाल्याने एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला. मंडळीकडे ट्रॉफी आल्याने सर्वांनाच मोठा आनंद झाला. दरम्यान, लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन याने बिग बॉस 16 मधून अधिक लोकप्रियता मिळवली. त्याच्या बोलण्याची स्टाइल अनेकांना भावली.