नवी दिल्ली – आसामच्या मध्यवर्ती भागात रविवारी दुपारी ४.१८ वाजता ४ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू नागाव जिल्ह्यात ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण तीरावर जमिनीपासून 10 किमी खोलीवर होता. हे ठिकाण मध्य आसाममधील होजई येथे गुवाहाटीपासून 160 किमी पूर्वेला आहे.
An earthquake of magnitude 4.0 on the Richter scale occurred at 1618 hours in Nagaon, Assam today: National Center for Seismology
— ANI (@ANI) February 12, 2023
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने एका अहवालात ही माहिती दिली आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तरेकडील सोनितपूर, पश्चिम कार्बी आंगलाँग, कार्बी आंगलाँग, गोलाघाट आणि मोरीगाव जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के जाणवले.