BigBreaking : हरिद्वारच्या कुंभमेळ्याला ‘या’ 12 राज्यांतील लोकांना बंदी

हरिद्वार – हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आढाव्यानंतर कुंभमेळा काळात करोनाचा उद्रेक होण्याचा इशारा दिला आहे.

करोनाची दुसरी लाट देशात आलेली असतानाच्या काळातच कुंभमेळा होत असल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय पथकाने हरिद्वार येथे होत असलेल्या कुंभमेळ्यात येणाऱ्या लोकांसाठी करण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तराखंडच्या सचिवांना पत्र पाठवून खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.

हरिद्वारच्या कुंभमेळ्याला ‘या’ 12 राज्यांतील लोकांना बंदी आपल्या सर्वांना माहितच आहे, की हरिद्वार हे भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. इतर दिवशीही भाविक या स्थळाला आवर्जुन भेट देतात. याशिवाय पर्यटकही मोठ्या संख्येने हरिद्वारला भेट देण्यासाठी येतात. हे लक्षात घेता, राज्य सरकारने कोरोना निगेटिव्ह चाचणी अहवाल 12 राज्यांतील लोकांसाठी अनिवार्य केला आहे. याअंतर्गत पर्यटक आणि भाविकांना त्यांच्यासोबत RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल आणणे बंधनकारक असेल. याबाबत अधिक माहिती देताना सीएम तीरथ सिंह म्हणाले, की सर्व भाविकांना गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

या वृत्तानुसार महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानमधील लोकांना हरिद्वार प्रवेशासाठी RT-PCR निगेटिव्ह चाचणी आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच वेळी, RT-PCR निगेटिव्ह चाचणी 72 तास आधीची असावी. जर एखाद्या व्यक्तीकडे आरटी-पीसीआर चाचणी अहवाल 72 तासांपेक्षा जुना नसेल, तर त्याला / तिला हरिद्वारमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

करोनाबाधित आढळून येत असल्याने पॉझिटिव्ही रेट वाढण्याची भीती आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्यामुळे दिवसाला 50 हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि पाच हजार आरटीपीसीआर चाचण्या पुरेशा नाहीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.