हरिद्वार – राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी कहर केला आहे. शनिवारी सकाळी हरिद्वार-बिजनौर मार्गावरील कोतवाली नदीत उत्तर प्रदेश रोडवेज ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची 70 प्रवाशांना घेऊन जाणारी बस अडकली. ही माहिती मिळताच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड पोलिसांनी बचाव मोहीम सुरू केली.
उत्तर प्रदेशातील रूपाडिया येथून एक बस हरिद्वारला येत होती. बसमध्ये 70 प्रवासी होते. हरिद्वार-बिजनौर मार्गावर उत्तर प्रदेश सीमेवरील कोतवाली नदीत बस अडकली. नदीच्या प्रवाहात बस अडकल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. मग उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड पोलीस घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य सुरू करण्यात आले. यावेळी एका जेसीबी चालकाने जेसीबीच्या माऊथमध्ये बसवून प्रवाशांना पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधून बाहेर काढले. नदीतून बाहेर येताच लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
लोकांना बाहेर काढल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने बसही नदीतून बाहेर काढण्यात आली. तीन तासांच्या बचाव कार्यात सर्व प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. जेसीबीच्या माऊथमध्ये बसवून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. शनिवारपासून पुढील चार दिवस राज्यभर मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने सर्व जिल्ह्यांना चार दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.