प्रयागराज – प्रयागराज येथे सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक प्रकारचे योगी साधू आणि हटयोगी येत असतात, त्यांच्या विविध प्रकारच्या लीला नेहमीच आकर्षणाचे केंद्र असतात. असाच एक हटयोगी साधू सध्या आकर्षणाचे केंद्र झाला आहे कारण या साधूने चक्क डोक्यावरील केसांमध्ये मातीचा कोणताही वापर न करता शेती करून दाखवली आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कोणत्या प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने शेती करावी अशा प्रकारचा संदेश देण्यासाठी हा हटयोगी साधू अशा प्रकारचा प्रयोग करत आहे साधारणपणे कोणतेही रोप जगण्यासाठी त्याला मातीचा आधार लागतो पण या साधूच्या डोक्यावर असलेल्या त्वचेमध्येच ही रोपे जिवंत राहतात या संपूर्ण प्रक्रियेचा या साधूला मोठ्या प्रमाणात त्रास होतो.
अनेक वेळा त्याच्या डोक्यावरील त्वचेतून रक्तप्रवाहही सुरू होतो पण रासायनिक खते न वापरण्याचा संदेश देण्याचे उद्देशातून हा सर्व त्रास सहन करत आहे या साधुने आपल्या डोक्यावर हरभरा उडीद गांजाची रोपेही उगवून दाखवली आहेत रोपे तयार झाल्यानंतर नऊ दिवसांनी ती रोपे कापली जातात त्यांचे विसर्जन केले जाते त्यानंतर नवीन प्रकारची रोपे उगवण्याची प्रक्रिया त्याच्या डोक्यावर तो सुरू करतो या सर्व कालावधीमध्ये त्याला आडवे पडून झोपता येत नाही त्यामुळे तो झोपताना सुद्धा बसूनच असतो अमरजित सोनभद्र असे या हटयोगी साधूचे नाव असून जर माझ्या डोक्यावर कोणत्याही खताचा आणि कीटकनाशकांचा वापर न करता रोपे चांगल्या प्रकारे उगत उगवत असतील तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारची रासायनिक खते आणि रासायनिक द्रव्य न वापरता नैसर्गिक शेती करावी असे आवाहन त्याने केले आहे.