नवी दिल्ली : देशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस सध्या दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका दहशहतवादी संघटनेकडून या संघाच्या त्या नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे ज्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात येणार असल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे.
‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने जम्मू-कश्मीरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘ग्रुपनं 30 आरएसएस नेते आणि कार्यकर्त्यांची यादी जारी केली आहे.
द रेझिस्टन्स फ्रंट ग्रुपनं दावा केला आहे, की ते जम्मू आणि कश्मीरमध्ये RSS कार्यकर्त्यांचे रक्त सांडतील.’ जानेवारीमध्ये सरकारनं यूएपीए अंतर्गत टीआरएफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.