नवी दिल्ली : जम्मू पुन्हा एकदा दुहेरी बॉम्बस्फोटाने हादरल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू शहरातील नरवाल भागात आज दुपारच्या सुमारास हे दोन बॉम्मस्फोट झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू शहरातील नरवाल भागात आज दुपारच्या सुमारास दोन बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या आहेत.
J&K | Two explosions occurred in Narwal area of Jammu; at least 6 people injured. Visuals from the second site. pic.twitter.com/rPJVroqpWm
— ANI (@ANI) January 21, 2023
या घटनेनंतर पोलिसांनी शहरात नाकेबंदी केली असून या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतली नाही, अशी माहिती जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी दिली आहे.