आकाश चंदाले याने विकी चंदाले याच्यावर तीन गोळ्या झाडल्या आहेत. त्यातील एक गोळी त्याला लागली आहे. पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतले आहेत. पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान येथील अग्रेसन स्कूल समोर हा प्रकार घडला आहे. जुना भांडणाचा वाद होता दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समजते. विकी याच्या पोटात गोळी लागली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. सहा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
गुन्हेगारांवर पुणे पोलिसांचा वचक आहे की नाही ? असा सवाल आता निर्माण झालायं .बेकायदा पिस्तूलं आणि त्यातून होणारे गोळीबार पोलिसांसाठी डोकं दुखी ठरू पाहतायत. शहरात सलग चौथ्या दिवशीही गोळीबाराचं सत्र कायम आहे. आज शुक्रवारी पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास येरवडा येथील अग्रसेन शाळेसमोर एका तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे.
तीन गोळ्या झाडण्यात आल्या असून एक गोळी तरुणाला लागल्याची माहिती आहे. पूर्वीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते. विकी चंदाले असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आकाश चंदाले याने हा गोळीबार केलाय. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
मंगळवारी दुपारी पावने दोन वाजता बांधकाम व्यवसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न झाला. बुधवारी सकाळी हडपसर येथे व्यवसायिक स्पर्धेतून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळ्या झाडल्या. गुरुवारी पहाटे भुमकर चौक नहरे येथे माचीस मागीतल्या कारणातून दोघांवर गोळीबार त्यानंतर आता येरवड्यात आता हा प्रकार घडला आहे.
हे वाचाल का ? मतदानासाठी लांबच लांब रांगा, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत २१ राज्यांतील लोकसभेच्या १०२ जागांवर मतदान सुरु