Lok Sabha Election 2024 । आज लोकसभा निवडणूक 2024 चा पहिला टप्पा आहे. या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यात 1600 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात नऊ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांचे भवितव्य पणाला लागले आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. आज अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभेच्या ९२ जागांवरही मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, पहिल्या टप्प्यात 16.63 कोटीहून अधिक मतदार आहेत. यामध्ये 8.4 कोटी पुरुष आणि 8.23 कोटी महिला मतदार आहेत. त्यापैकी 35.67 लाख मतदार असे आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तर 20 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या 3.51 कोटी आहे. यासाठी १.८७ लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
हे वाचले का ?
पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान; १९ राज्यांमधील १०२ मतदारसंघ सज्ज