मुंबई – अनेकदा चित्रपट हे त्यांच्या बिग बजेटमुळे चर्चेत राहतात. त्याचप्रमाणे काही टीव्ही शो देखील आहेत, जे त्यांच्या प्रचंड बजेटमुळे चर्चेत राहतात. यापैकी एक शो म्हणजे बिग बॉस. सलमान खानने या शोचे मागील अनेक सीझन होस्ट केले आहेत.प्रेक्षकांनी देखील या शोला पाहणे अधिक पसंत केलं आहे. त्यामुळे या शोची गणना सगळ्यात जास्त चालणाऱ्या शोमध्ये केली जाते.
सलमान खानचे फॅन्स दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.त्याचा बिग बॉस या शोला देखील मोठ्या प्रमाणात फायदा होतो. प्रेक्षकांनी त्याला अनेकदा सोशल मीडियावरून शो बाबतच्या फीज बद्दल देखील विचारले. सध्या भाईजानने ‘बिग बॉस 16’ साठी त्याच्या आधीच्या फीपेक्षा 3 पट जास्त फी मागितली असल्याची सिने वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
सलमान खानने केली फी वाढीची मागणी?
बिग बॉस आणि सलमान खान यांचे नाते खूप जुने आहे यात शंका नाही. या शोचे अनेक सीझन सलमानने होस्ट केले आहेत. प्रेक्षकांना देखील त्याला ‘बिग बॉस 16’ होस्ट करताना पाहायचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानने शो मेकर्सकडे त्याची फी 3 पट वाढवण्याची मागणी केली आहे. सलमान खानने सीझन 15 साठी 350 कोटी रुपये घेतले असल्याची चर्चा होती. सीझन 16 साठी सलमान अधिकच्या रकमेची मागणी करत असल्याच्या चर्चा सध्या सिने वर्तुळात सुरु आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सध्या उपलब्ध नाही.
शो निर्माते ‘बिग बॉस 16’ ची तयारी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार निर्माते ‘बिग बॉस 16’ ची तयारी करत आहेत. या शोसाठी त्याने याआधीही अनेक सेलिब्रिटींशी संपर्क साधला आहे. या शोचा भाग होण्यासाठी निर्मात्यांनी अर्जुन बिजलानी, शायनी आहुजा आणि दिव्यांका त्रिपाठी यांसारख्या सेलिब्रिटींशी संपर्क साधला असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे यंदाचा सिझन कोण होस्ट करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.