मुंबई – अभिनेत्री शमिता शेट्टीचा बॉयफ्रेंड अभिनेता राकेश बापटला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर रुग्णालयातील एक फोटो पोस्ट करत त्याने ही माहिती दिली आहे. राकेशची ही पोस्ट पाहून चाहतेही चिंता व्यक्त केली आहे. मात्र त्याला नेमकं काय झाले आहे. हे अद्याप समजू शकलेले नाही.
राकेशने इनस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो रुग्णालयात उपचार घेताना दिसत आहे. मात्र यामध्ये राकेशचा चेहरा दिसत नाही. तसेच त्याला नेमकं काय झाले आहे ? हे त्याने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे चाहते देखील त्याला नेमके काय झाले आहे? असे विचारत आहे. तसेच त्याला लवकर बरं होण्याचा सल्लाही देत आहेत.
दरम्यान, 2021 मध्ये बिग बॉसमध्ये ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये शमिता आणि राकेश सहभागी झाले होते. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. यावेळी अभिनेता राकेश बापट आणि शमिताच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले. मात्र त्यांचे नाते फार टिकू शकले नाही. त्यानंतर आता शमिता टीव्ही अभिनेता आमिर अलीला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.