Entertainment : टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकने (Rubina Dilaik) काही दिवसापूर्वीच आई होणार आल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. सध्या ती गरोदरपणाचे दिवस एन्जॉय करत असून सोशल मीडियावर ती अनेक फोटो शेअर करताना दिसते. गरोदरपणातील तिचे अनेक फोटो चांगलेच चर्चेत राहिले आहे. रुबिना दिलैकने आपल्या प्रेग्नंसीविषयी अनेक खुलासे केले आहेत. मात्र एका मुलाखतीदरम्यान तिने जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचा पहिल्यांदाच खुलासा केला आहे.
एका पॉडकास्टमध्ये रुबिना म्हणाली, ‘जेव्हा आम्हाला समजलं की मला जुळी मुलं होणार आहेत मी आणि अभिनव शॉक झालो होतो. सुरुवातीचे 12 आठवडे खूप काळजीचे असतात कोणालाही सध्यातरी याबद्दल सांगू नका असं म्हणत डॉक्टरांनी आम्हाला चिंतेत पाडले होते. म्हणून आम्ही 3 महिन्यापर्यंत कोणालाही ही बातमी कळू दिली नव्हती.’
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, ‘तिसऱ्या महिन्यात प्रेग्नंसी स्कॅननंतर जेव्हा मी परत निघाले होते तेव्हा माझ्या गाडीचा छोटा अपघात झाला. जसा गाडीचा ब्रेक लागला आधी मी सीटच्या मागे धडकले आणि नंतर माझं डोकं समोरच्या सीटवर आदळलं. त्याक्षणी मी खूप घाबरले होते आणि माझी मुलं ठीक तर आहेत ना असे प्रश्न पडले. याच कारणाने आम्ही प्रेग्नंसीची बातमी लपवून ठेवली.’
दरम्यान, रुबिना लवकरच आई होणार असल्याने तिच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच तिने केलेलं प्रेग्नंसी फोटोशूट चर्चेत होतं. यात तिने ऑरेंज कलरचा ड्रेस परिधान केला होता. तर यावर सुंदर ज्वेलरी देखील घातली होती. तिचा हा चाहत्यांच्या देखील चांगलाच पसंतीस पडला होता. रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. रुबिना दिलैक ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘बिग बॉस 14’मुळे (Bigg Boss 14) अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली.