Sai Lokur : अभिनेत्री सई लोकूरच्या घरी (Sai Lokur) नुकतेच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. 17 डिसेंबरला तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सोशल मीडियाद्वारे तिने आई झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. आता सईच्या चिमुकल्या लेकीचा बारसे सध्या पद्धतीने पार पडले. या सोहळयाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सईने घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने लेकीचे बारसे केलं आहे. यावेळी सईने घराला छान सजवले होते. लेकीच्या पाळण्याभोवती फुलांची सजावट केली होती. सई आणि तिच्या नवऱ्याने लेकीच्या बारसा सोहळ्याला व्हाईट कलरचे कपडे परिधान केले आहेत. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. ‘नव्याने पालक झालो त्याचा आनंद आणि अभिमान वाटत आहे’, असं कॅप्शन सईने या फोटोला दिले आहे.
View this post on Instagram
सईच्या या फोटोवर लाई्क्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मात्र सईने बाळाचे नाव काय ठेवले हे अद्याप सांगितले नाही. दरम्यान,सईने नोव्हेंबर 2020 मध्ये तीर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली होती. सईने बंगाली आणि मराठी पद्धतीने लग्न केले होते. लग्नानंतर आता दोन वर्षांनी सई आणि तीर्थदीप आई-बाबा झाले आहेत. सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘जरब’, ‘मी आणि यू’, ‘कीस किसको प्यार करु’ या चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. यामुळे सईला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.