– सहकारनगर पोलिसांच्या कारवाई
पुणे : के. के. मार्केट, हत्ती चौक आणि बालाजी नगर भागातील सायकल चोरणाऱ्या एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ६ सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
अंकुश भाऊसाहेब गोडगीरे (वय-२१, रा. शिवाजीनगर बस स्टॅन्ड मागे, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी हद्दीत चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलींग करत होते. जवाहर बेकरी धनकवडी येथे एक तरुण सायकलवर संशयास्पद फिरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना माहिती मिळाली होती. यानंतर सापळा रचून अंकुश भाऊसाहेब गोडगीरे याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो सायकलसह पळून लागला.
पोलिसांनी काही अंतरावर त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या सायकल बाबत विचारणा केली असता त्याने सायकल चोरी असल्याचे कबूल केले. याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास केला असता जानेवारी २०२४ पासून त्याने के.के. मार्केट, स्मशानभुमी रोड तीन हत्ती चौक, बालाजी नगर या ठिकाणाहून पाच सायकली चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी आरोपीकडून सहा सायकल जप्त केल्या आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परीमंडळ 2च्या स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, सहायक पोलीस फौजदार बापु खुटवड, पोलीस अंमलदार किरण कांबळे, अमोल पवार, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर कुंभार, सागर सुतकर, अमीत पद्माळे, संजय गायकवाड, निलेश शिवतरे, विशाल वाघ, भाऊसाहेब आहेर यांच्या पथकाने केली.