पुणे : शुक्रवारी पहाटेच्या वेळी गजबजलेल्या असणाऱ्या गंगाधाम शत्रुंजय मंदिर रोडवर असणाऱ्या आई माता मंदिराजवळ मोकळ्या जागेत असलेल्या एका गॅरेजला आग लागल्याची घटना घडली. आग पहाटे ३:२० लागलल्याची माहिती मिळाली यामध्ये गॅरेज मधील १७ चारचाकी वाहने जळून खाक झाली.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची ४ वाहणे घटनास्थळी दाखल होत अग्निशमन जवानांनी आगीवर नियंञण मिळवले. या आगीमध्ये कोणीही जखमी नसून जिवितहानी देखील नाही. आगीचे नेमके कारण समजले नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
आग मोठी असल्याने आगीचे लोट खूप मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे परिसरात धूर पसरला होता. पहाटेची वेळ असल्याने त्याचबरोबर रस्त्यावर राहादारी नसल्याने अग्निशमन यंत्रणा लवकर घटना स्थळी पोहचली व आग लवकर आटोक्यात आली.