भुवनेश्‍वरचा कसोटीला राम राम?

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. भुवनेश्‍वर केवळ टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे.

भुवनेश्‍वरला कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेचा अंतिम सामना व त्यापूर्वी इंग्लंडमध्ये होत असलेली कसोटी मालिका मात्र खेळणार होता. परंतु, यासाठी निवडलेल्या संघात त्याला स्थान देण्यात आलेले नसल्याने हे वृत्त खरे असल्याचेही सांगितले जात आहे.

भुवनेश्‍वर कुमारने जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. मात्र, यानंतर दुखापतीमुळे तो संघात आत-बाहेर होत राहिला. भुवनेश्‍वर कुमार आतापर्यंत बऱ्याच वेळा दुखापतग्रस्त झाला आहे आणि यामुळे तो आयपीएल किंवा भारताकडून सातत्याने खेळू शकला नाही. कदाचित यामुळेच भुवनेश्‍वरने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडमध्ये सर्वात यशस्वी

भुवनेश्‍वरने त्यानंतर आतापर्यंत त्याने केवळ 21 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 26.09 च्या सरासरीने 63 बळी घेतले आहेत. भुवनेश्‍वरने इंग्लंडविरुद्ध 5 कसोटीत 19 बळी घेतले आहेत. 2014 सालच्या दौऱ्यात भुवनेश्‍वरने ही कामगिरी केली होती. त्या मालिकेत तो भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.