अहमदाबाद – गुजरातच्या काही भागांना सोमवारी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.5 इतकी नोंदली गेली. सुदैवाने, भूकंपामुळे कुठलीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.
रविवारची मध्यरात्र उलटल्यानंतर 3.37 वाजता भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू सौराष्ट्र विभागात गीर सोमनाथ जिल्ह्यात होता. तौक्ते चक्रीवादळाने गुजरातचे टेन्शन वाढवले आहे. अशातच भूकंपाचा धक्का बसला.
अर्थात, बहुतांश नागरिक झोपेत असताना भूकंप झाल्याने अनेकांना तो जाणवला नाही. भूकंपात कुठली हानी झाली नसल्याचे वृत्त दिलासादायी ठरले. याआधी मागील वर्षी 16 जुलैला गुजरातमध्ये भूकंप झाला होता. राजकोटजवळ जाणवलेल्या त्या भूकंपाची तीव्रता 4.8 इतकी नोंदली गेली होती.