मुंबई – अभिनेत्री भूमी पेडणेकर ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या कारकिर्दीत भूमीने अनेक सामाजिक विषयांवर बनवलेल्या चित्रपटांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवली. सध्या भूमी आणखी नवीन प्रकल्पांवर काम करत आहे. अशात सोशलवर तिचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे,
भूमीने मॅशेबलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘YRF कडून सहाय्यक कास्टिंग डायरेक्टर म्हणून ऑफर आली होती, विशेष म्हणजे भूमी पेडणेकरने सहा वर्षे सहाय्यक कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले. चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम केले आणि प्रॉडक्शन हाऊसमध्ये विविध नोकऱ्या केल्या आहे. पेडणेकरने खुलासा केला की, तिने ‘पावडर’ चित्रपटासाठी पंकज त्रिपाठीचे ऑडिशन घेतले. तर ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटासाठी रणवीर सिंगच्या ऑडिशन प्रक्रियेची ती देखील एक भाग होती. ‘मी रणवीरच्या ऑडिशन प्रक्रियेचा भाग होते. आणि मला आठवते, तो खोलीत येताच एक विचित्र वातावरण होते, ऊर्जा होती आणि तो आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत होता आणि मी त्याच्यासोबत काम केले, जे खरोखरच खूप छान अनुभव होता.’ हे दोन्ही चित्रपट 2010 मध्ये आले होते.
भूमी शेवटची ‘अफवाह’ आणि ‘भिड’ सारख्या चित्रपटात दिसली होती. याशिवाय ती ‘थँक यू फॉर कमिंग’, ‘भक्त’, ‘द लेडी किलर’ आणि ‘मेरी पटनी का रिमेक’ या सिनेमांमध्ये दिसणार आहे. भूमीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर ती यश कटारियाला डेट करत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. 17 ऑगस्ट 2023 रोजी, अभिनेत्रीने त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पोस्ट केल्या.