भोर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भोर पोलीस स्टेशनच्या वतीने “जयंती घरी साजरी करा’ या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्रावर निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. विजेत्या स्पर्धकांना भोरचे पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधून सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून स्पर्धकांना प्रशस्तिपत्रके देण्यात आली.
यावेळी पोलीस कर्मचारी अनिल हिप्परकर, अप्पा हेगडे, राहुल मखरे, विश्वनाथ जाधव उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये प्रथम पाच विद्यार्थ्यांमध्ये अंकिता जाधव, पूर्वा माने, पूजा माथूर, आर्यन निकम, शुभम गायकवाड यांना प्रशिस्तपत्र व रोख रक्कम पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्या हस्ते देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून आप्पा हेडगे व अनिल हिप्परकर यांनी काम पाहिले.