वीसगाव खोरे, (वार्ताहर) – नेरे (ता.भोर) येथे भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटें यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय आवारी ते कुस्ती आखाडा रस्ता ५ लक्ष रुपये काँक्रिटच्या रस्त्याचे भूमीपूजन अनिल सावले यांच्या हस्ते करण्यात आले.
मागील दोन वर्षात आमदार संग्राम थोपटें यांच्या मार्गदर्शना खाली नेरे गावातील जवळ जवळ २ कोटी रुपयाचे विविध विकास कामे झाली त्यामध्ये अंतर्गत रस्ते, जालजीवन पाणी योजना,सभामंडप, गटारे, स्मशान भूमी, ग्रामपंचायत कार्यालय,दलित वस्ती वरील कामे कारण्यात आल्याचे युवा नेते अनिल सावले यांनी सांगितले.
या वेळी सरपंच विजय बढे, उपसरपंच राजेंद्र चिकणे, चेअरमन दतोबा सावले, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य शिवाजी पाटणे, तंटामुक्ती अध्यक्ष आंनदा बढे, रामभाऊ दीक्षित, अंकुश सावले,महेश उभे, दत्तात्रय बुधे, रमेश सावले, नारायण उल्हाळकर, नारायण भरगुडे, कांता पवार, मोहन वीर,
आनंदा सावले, समीर पाटणे, सुरेश बदक, दत्तात्रय पवार, माऊली कानडे, संग्राम कानडे,किसन उल्हाळकर,बाप्पू मैद,दशरथ भरगुडे, दादा सावले, याच बरोबर नेरे, पुणे मुंबई गावचे ग्रामस्थ, तरुण मंडळ उपस्थित होते.