मंचर-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आंबेगाव पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, संचालक दगडू शिंदे, माजी सभापती आनंद शिंदे, सरपंच संगिता शिंदे, उपसरपंच मल्हारी वायाळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कल्याण शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय वायाळ, युवक अध्यक्ष राजू भोर, माजी सरपंच शकुंतला शिंदे, सदस्य विकास भोर, अनिल शिंदे, राजू शिंदे, संगिता क्षिरसागर, प्रसाद कराळे, प्रमोद शिंदे, तुषार टेमकर, माजी उपसरपंच दिनेश खेडकर, भाऊसाहेब टाव्हरे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात यांच्या नागरी सुविधा विकास निधी व मुद्रांक शुल्क निधीतून अवसरी खुर्द येथे प्रवेशद्वार व परिसर सुशोभीकरण कामासाठी 9 लाख 50 हजार रुपये, पालखी मार्ग रस्ता करणे 14 लाख रुपये मंजुर झाले आहेत, असे सभापती संजय गवारी यांनी यावेळी सांगितले.