मुंबई – “भूल भुलैया’ बॉलिवुडमधील सर्वाधिक हिट चित्रपटांपैकी एक आहे. आता या चित्रपटाचा सीक्वल साकारण्यात येत आहे. “भुल भुलैया-2’मध्ये कार्तिक आर्यन तसेच अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पार्टमध्ये ही भूमिका अक्षय कुमारने साकारली होती. तसेच पहिल्या भागातील विद्या बालनची भूमिका चाहत्यांना सर्वाधिक आवडली होती. तिने अवनिची भूमिका साकारली होती, जी नंतर मंजुलिकेच्या भूमिकेत समोर येते.
View this post on Instagram
‘भूल भुलैया 2’ मोठ्या थिएटरमध्ये रिलीज होण्याच्या तयारीत आहे. बऱ्याच विलंबानंतर, निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला टीझर आणि रिलीजची तारीख जाहीर केली. सोशल मीडियावर, कियारा अडवाणीने कॉमेडी हॉरर चित्रपटाची झलक असं कॅप्शन देत या चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे. टीझर शेअर करताना, कियाराने ट्विट केले, “झपाटलेली हवेली त्याचे दरवाजे पुन्हा उघडण्यासाठी सज्ज आहे! तुम्ही तयार आहात का? आता टीझर बाहेर!”
View this post on Instagram
तर कार्तिकने ट्विट करत या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरला त्याने कॅप्शन दिले आहे की,’मिलिये मेरी सहेलियों से
#रूहबाबा’ या पोस्टरमध्ये कार्तिक आर्यन जितका शांत दिसत तितकीच या पोस्टरमुळे चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, तब्बू, राजपाल यादव आणि संजय मिश्रा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. T-Series आणि Cine 1 Studios च्या बॅनरखाली भूषण कुमार, मुराद खेतानी, अंजुम खेतानी आणि कृष्ण कुमार निर्मित भूल भुलैया 2 हा कॉमेडी हॉरर चित्रपट 20 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.