मंचर (प्रतिनिधी) -वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे उपचार घेणाऱ्या 10 बाधित करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी गुलाबपुष्प देवून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
वडगाव काशिंबेगचे 7, फदालेवाडी गावातील 3 बाधितांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृृष्णदेव खराडे, घोडेगावचे सहायक निरीक्षक प्रदीप पवार उपस्थित होते. वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, प्रशासकीय अधिकारी आणि भीमाशंकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीरंग फडतरे, राहुल पावडे, सचिन शिंदे आणि व्यवस्थापनाचे रुग्णांनी आभार मानले. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये आता नऊ बाधितांवर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे डॉ. ढेकळे यांनी सांगितले.