भोर/भाटघर – मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ब्रिटीशकालीन भाटघर धरण रविवारी (दि. 4) सायंकाळी 4.20 वाजण्याच्या सुमारास 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाच्या स्वयंचलित 45 मोऱ्यांमधून सुमारे 8000 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
तसेच तालुक्यातील पावसाची आणि पूरस्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून उद्या (5 आॅगस्ट) सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.