पुणे विभागीय महसूल प्रशासन सज्‍ज– डॉ. म्‍हैसेकर

कोल्हापूर- गेले दोन – तीन दिवस पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हयातील पश्चिम भागात अतिवृष्टी होत असून त्यामुळे पुणे जिल्हयातून वाहणा-या इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा या सर्व नदया दुथडी भरुन वाहत आहेत. त्याच प्रमाणे सातारा जिल्हयातील कृष्णा कोयना, तारळी, उमोडी या नदयांनाही पूर आलेला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील पंचगंगा, वारणा, या नदयासुध्दा दुथडी भरुन वाहत आहेत, अशी माहिती पुणे विभागाचे महसूल आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिली. पूर परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून सर्व विभाग सतर्क ठेवण्‍यात आले आहेत.

पुणे महसूल विभागात आज अखेरीस 120 टक्‍के पाऊस झाला आहे. पुणे विभागातील जिल्हा निहाय झालेला पाऊस खालील प्रमाणे- पुणे जिल्हा 153 टक्‍के, सोलापूर 78 टक्‍के, सातारा 150 टक्‍के, सांगली 188 टक्‍के, आणि कोल्हापूर 95 टक्‍के भरलं आहे. अशी माहिती पुणे विभागीय आयुक्तांनी दिली आहे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.