जयपुर – काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते राजस्थान सरकारचे सामाजिक न्याय मंत्री भंवरलाल मेघवाल यांचे आज (सोमवारी) सायंकाळी निधन झाले. ते 72 वर्षाचे होते. मेघवाल यांच्या निधनाने काॅंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मेघवाल यांच्या निधनानंतर मंगळवारी होणारे काॅंग्रेसचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. एक कुशल प्रशासक म्हणून मेघवाल यांना ओळखले जाते. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या आधीच्या सरकारमध्ये ते शिक्षणमंत्री होते.
Saddened by the demise of Rajasthan Cabinet Minister, Master Bhanwarlal Meghwal Ji. He was a veteran leader who was passionate about serving Rajasthan. In this hour of sadness, my condolences to his family and supporters: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 16, 2020
ते सध्या चूरू येथील सुजानगढचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भंवरलाल मेघवाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.