वॉशिंग्टन – अवघ्या जगाला वेठीस धरलेल्या कोरोना विषाणूवर प्रभावी लस अथवा औषधोपचार कधी उपलब्ध याकडे अवघ्या जागाच लक्ष लागून राहील आहे. अशातच आज अमेरिकेतील प्रसिद्ध फार्मा कंपनी असलेल्या मॉडर्नाने आपण कोरोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावा केलाय.
कंपनीने याबाबत केलेल्या दाव्यानुसार, मॉडर्नाने तयार केलेली लस ही ९४.५ टक्के प्रभावी आहे. लेट-स्टेज क्लिनिकल ट्रायलच्या सुरुवातीच्या डेटाच्या आधारावर कंपनीने हा दावा केला आहे.
दरम्यान, एकाच आठवड्यात अशाप्रकारचा दावा करणारी मॉडर्ना ही दुसरी कंपनी ठरली असून यापूर्वी फाईजर या कंपनीने आपली लस ९० टक्के प्रभावी असल्याचं म्हंटल होत. लस विषयक तज्ज्ञांनी लस ५० ते ६० टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरेल असे अंदाज बांधले होते. मात्र या दोन्ही कंपन्यांनी केलेले दावे सुखावणारे ठरले आहेत.
Moderna Inc says its experimental vaccine is 94.5% effective in preventing #COVID19 based on interim data from a late-stage clinical trial: Reuters pic.twitter.com/UBU6v5p6Ou
— ANI (@ANI) November 16, 2020