जम्मू-काश्मीर : पाकिस्तानने सोमवारी संध्याकाळी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीर येथील कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं आहे. भारतीय सैन्यदेखील पाकिस्तानच्या या हल्ल्यास प्रत्युत्तर देत आहे.
J&K: Pakistan initiated ceasefire violation along LoC in Tangdhar Sector of Kupwara district today evening. Indian Army is retaliating.
— ANI (@ANI) November 16, 2020
दरम्यान, दरम्यान, गेल्या काही दिवसांत अनेकवेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील तीन सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यात तीन सुरक्षा कर्मचार्यांसह सहा जण ठार झाले होते. बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमधील इजमार्ग येथे सर्वात प्रथम शस्त्रसंधीचं करण्यात आलं. यानंतर काही मिनिटांनी कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्येही गोळीबार करण्यात आला.