Entertainment : बॉलीवूड अभिनेता-निर्माता अरबाज खान (Arbaaz Khan) 24 डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला. गेल्या दोन दिवसांपासून या अभिनेत्याच्या लग्नाच्या बातम्या सातत्याने मीडियात येत आहेत. अखेर त्याने गर्लफ्रेंड शौरा खानसोबत विवाह केला. सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिच्या घरी अरबाज आणि शूरा यांचा निकाह पार पडला. सध्या या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. यातच आता अरबाज खानच्या लग्नात धाकटा भाऊ सलमान खानचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये ती ‘दिल दियां गल्लन’ आणि ‘तेरे मस्त मस्त दो नैन’ या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. शूरा आणि अरहान खानही त्याच्यासोबत डान्स करताना दिसत आहेत. त्याच्यासोबत अरहान खान, अलविरा खान अग्निहोत्री, शूरा खान हे देखील त्याच्यासोबत डान्स करताना दिसले त्याच्या या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत “भाऊ, तुम्ही किती दिवस इतरांच्या लग्नात नाचत राहाल?” असे लिहिले आहे. या लग्न सोहळ्यासाठी सलमान राखाडी रंगाच्या पठाणी सूटमध्ये दिसला.
★ ADORING… #SalmanKhan Dancing on #TereMastMast at #ArbaazKhan’s Wedding!
-Dec 24, 2023https://t.co/O9rgzDWGkC pic.twitter.com/aliMrhQTey
— SalmanKhanHolics.com (@SalmanKhanHolic) December 24, 2023
अरबाज खानच्या आयुष्यातील या महत्वाच्या दिवशी त्याचे भाऊ सलमान खान आणि सोहेल खान, वडिल सलीम खान, आई सलमा खान आणि त्याचा मुलगा अरहान खान हे संपूर्ण खान कुटुंब अरबाजसोबत होते. अरबाज खानच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर, 1998 मध्ये त्याने मलायका अरोरासोबत लग्न केले होते. हे लग्न जवळपास 17 वर्षे चालले आणि नंतर 2017 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. अरबाजला मलायकापासून एक मुलगाही आहे ज्याचे नाव अरहान खान आहे. यानंतर अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याने चर्चेत आला होता, मात्र काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. आता अरबाजने शूरा खानसोबत लग्नगाठ बांधली आहे.