Bollywood News नुकतेच अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत लग्न केले. यापूर्वी त्याचे नाव जॉर्जिया अँड्रियानीशी जोडले गेले होते. अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी एकमेकांना बराच काळ डेट करत होते. मात्र लग्नाआधीच दोघांचे ब्रेकअप झाले. अशात अरबाज खानसोबतच्या ब्रेकअपनंतर जॉर्जिया एंड्रियानीने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
जॉर्जिया एंड्रियानी म्हणाली, अरबाज सोबत ब्रेकअप झाल्यानंतर मी आयुष्यात एका शून्यातून जात आहे. असं म्हणत जॉर्जियाने एक्स बॉयफ्रेंड अरबाज खानचेही कौतुक केले. जॉर्जिया एंड्रियानीने अरबाज खानसोबतच्या ब्रेकअपबद्दल सांगितले आहे की, प्रेमसंबंध सोडणे नेहमीच कठीण असते.’
अरबाजला एक चांगला माणूस म्हणून सांगताना ती म्हणाली की,’मी त्याला शुभेच्छा देते. जॉर्जिया एंड्रियानी म्हणाली, ‘अरबाज एक चांगला माणूस आहे. होय, आम्ही वेगळे झालो आणि जोडीदार सोडण्याची शून्यता कायम राहील. विसरणे सोपे नाही कारण आपण वैयक्तिकरित्या एखाद्याच्या नात्यात गुंतलेले असतो, परंतु जेव्हा नाते संपते तेव्हा आपल्याला पुढे जावे लागते. तो त्याच्या आयुष्याच्या दुसऱ्या अध्यायाकडे वाटचाल करत असताना मी त्याला शुभेच्छा देते.’
अरबाज खानने मलायका अरोरासोबत 1998 मध्ये लग्न केले होते. दोघेही अरहान खान या मुलाचे पालक झाले. त्यानंतर 2016 मध्ये या जोडप्याने वेगळे होण्याची घोषणा केली आणि 2017 मध्ये घटस्फोट घेतला. सध्या दोघेही आपल्या मुलाचे सहपालन करत आहेत.