Shehnaaz Gill । अभिनेत्री शहनाज गिलने बॉलीवूडमध्ये कमी वेळात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शहनाजने सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता, आता ती तिचा भाऊ अरबाज खानच्या चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.
शहनाजने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ‘पटना शुक्ला’ चित्रपटातील गाण्याची एक झलक आहे. ‘दिल क्या इरादा तेरा…’ असे या गाण्याचे बोल आहेत. शहनाजने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चित्रपटासाठी पार्श्वगायिका म्हणून हा माझा पहिला अनुभव आहे. मला ही संधी दिल्याबद्दल अरबाज खानचे आभार…!”पटना शुक्ला’ चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक बुडाकोटी आणि राजेंद्र तिवारी यांनी केले आहे. यात रवीना टंडन, मानव विज, चंदन रॉय सन्याल, जतिन गोस्वामी आणि अनुष्का कौशिक यांच्या भूमिका आहे. दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांनीही यात काम केले होते, त्यांचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे.
शहनाज गिलच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, ती ‘सब फर्स्ट क्लास’ या चित्रपटातही दिसणार आहे. यामध्ये ती वरुण शर्मासोबत दिसणार आहे. तिने चित्रपटाच्या टीमसोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले – ‘2024 ची सुरुवात.’