टायगर ३ साठी भाईजानची जोरदार तयारी, सलमानचा वर्कआऊट पाहून चाहते म्हणाले

बॉलीवूडमधील भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान हा आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक सुपरहिट हिरो मानला जातो. त्याचे प्रत्येक चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करतात. आता लवकरच सलमान खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘टायगर-3’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खानने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जिममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘I think this guy is training for Tiger3 . .’ या चित्रपटाच्या आधी आलेले ‘टायगर जिंदा है’ आणि ‘टायगर’ हे दोन्हीही ऍक्‍शन चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर हिट ठरले होते. भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये असणारा वाद आताशा बऱ्याच चित्रपटांमध्ये दाखवला गेला आहे. यशराज बॅनरखाली बनणाऱ्या या सिनेमामध्ये इम्रान हाश्‍मीदेखील एका प्रमुख भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.