टोकियो – मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये काल रौप्यपदक जिंकत इतिहास घडविला. मिराबाई चानूने 49 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले. मणिपूरच्या या पोलादी महिलेने एकूण 202 किलो वजन उचलण्याची कामगिरी केली. तिने 87 किलो स्नॅच प्रकारात तर 115 किलो क्लीन अॅण्ड जर्क प्रकारात उचलले. दरम्यान मिराबाई चानू यांच्यासाठी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी एक कोटींचं बक्षीस जाहीर केले आहे.
पदक जिंकल्यानंतर मीराबाई चानूला एका एका वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नावर, पदक जिंकल्यानंतर पहिलं पिझ्झा खायचा आहे, असे भन्नाट उत्तर दिले मीराच्या या उत्तराची दखल घेत, डोमिनो पिझ्झाने मीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत देण्याची घोषणा केली आहे.
मीराबाईने सांगितलं अन् आम्ही ते ऐकलं. मीराबाईने पिझ्झा खाण्यासाठी अजिबात वाट पाहायची गरज नाही,असे डोमिनो इंडिया या ट्विटर अकाऊंटवरुन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे, डोमिनो कंपनीने मार्केटींगचा चांगला उपयोग करत, ऑलिंपिक विजेत्या मीराबाईला मोफत पिझ्झा ऑफर केला आहे. आता, मीराबाई यावर काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
मीराबाई चानूची कामगिरी
– टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक
– भारतीय महिला क्रीडापटूने मिळवलेले हे सहावे ऑलिम्पिक पदक
– भारताच्या खात्यावरील 29व्या ऑलिम्पिक पदकाची नोंद
– वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे दुसरे पदक
– भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे 18वे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक