मुंबई – बॉलिवूडचा भाई जान म्हणजेच अभिनेता ‘सलमान खान’चा बहुचर्चित “राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट नुकताच (दि. 13) प्रेक्षकांच्या भेटीला आला. आतापर्यंत सलमानच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.
दरम्यान, ‘राधे’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आणि यानंतर अवघ्या काही तासांतच हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला. त्यानंतर तातडीने निर्मात्यांनी याविरोधात मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, हा चित्रपट 50 रुपयांमध्ये व्हॉट्सअपद्वारे विकला जात असल्याचे समोर आले.
चित्रपट लीक झाल्यानंतर भाईजानच्या चाहत्यांमध्ये काहीसे संतापाचे चित्र दिसत आहे. अनेकांनी चित्रपट लीक करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पहिला गेलं तर समीक्षकांना ‘राधे’ चित्रपट फार भावला नाही. पण सलमानच्या चाहत्यांनी मात्र चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आहे.