मुंबई – शिवसेना पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे उघड-उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार असून हे सर्व बंडखोर गुवाहाटीमध्ये ठाण मांडून आहेत.
दुसरीकडे शिवसेनेशी दगाबाजी केली म्हणत राज्यातील शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करत आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना करोनामुक्त झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सक्रीय झाले आहेत.
त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक तसेच मुंबईचे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले असून सर्व बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवावी, असे आदेश दिले आहेत.