हडपसर – केंद्र सरकारने सीसीआयएमच्या नोटिफिकेशनद्वारे शत्रक्रिया करण्याची परवानगी आयुर्वेदाच्या पदव्युत्तर डॉक्टरांना देऊन आयुर्वेद डॉक्टरांच्या कायदेशीर हक्कांवर शिक्कामोर्तब केल्याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार राज्यातील सर्व आयुर्वेद डॉक्टरांच्या वतीने मानण्यात आले.
याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्ष, वैद्यकीय आघाडी आयुर्वेद विभागाच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवन येथे विशेष भेट घेऊन देण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय आघाडीचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपळे यांनी दिली.
बलशाली भारत बनवण्यासाठी व देशात सर्वदूर खेडोपाडी सक्षम, अशी समांतर वैद्यकीय व्यवस्था बळकट करण्यासाठी, सदर नोटिफिकेशन कायमसाठी अमलात राहावे, या विषयी सीसीआयएम सदस्य, सदानंद सरदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी डॉ. बाळासाहेब हरपळे यांच्यासह आयुर्वेद विभागाच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. उज्ज्वला हाके, डॉ. सुनील आवारी, डॉ. सुकुमार सरदेशमुख, डॉ. सुहास मारणे, डॉ. आंग्रे, प्रणव हरपळे आदी उपस्थित होते.