fbpx

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी सापडले कात्रीत

मुंबई – उत्तराखंड हायकोर्टाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याविरोधात कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी आज नोटीस पाठवली आहे. थकबाकी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणाची ही नोटीस आहे. कोश्‍यारी यांनी या नोटिशीचे उत्तर चार आठवड्यांत देण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहे.

रुरल लिटिगेशन अँड एंटाइटेलमेंट केंद्राने (रूलक) उत्तराखंड हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत माजी मुख्यमंत्र्यांनी सरकारी सुविधांच्या लाभापोटीचं भाडे सहा महिन्यांत जमा करण्याची मागणी केली होती.

हायकोर्टाने त्यानुसार कोश्‍यारींना भाडे भरण्याचे आदेश दिले होते. मात्र हे भाडे जमा न केले नाही. कोश्‍यारी यांनी 47 लाखांपेक्षा अधिक रुपये थकवल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.

सध्या महाराष्ट्रात कोश्‍यारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं उघडण्याबाबत वादग्रस्त पत्र पाठवून वाद ओढवून घेतला होता. आता कोश्‍यारी यांच्याविरोधात कोर्टाच्या अवमानाची नोटीस जारी करण्यात आली असल्याने ते कात्रीत सापडले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.