पुणे – देशावर सध्या करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचे सावट आहे. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याचे सरकारचे प्रयत्न आहे. मात्र सर्वसामान्य नागरिक जोपर्यंत काळजी घेत नाही, तोपर्यंत करोनाला रोखणं कठिण आहे. त्यातच पुणेकरांची चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे. यामध्ये करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के नागरिक करोना बाधित झाल्याचं समोर आलं आहे.
पुणे महापालिकेची नुकतीच करोना आढावा बैठक पार पडली. त्यात दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोक करोनाबाधित होताना दिसत असल्याचं समोर आले आहे. मागील 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या पाच ते सहा दिवसात पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच आठ दिवसात पुण्यात अॅक्टिव्ह रुग्ण संख्या चौपट झाल्याचं समजतंय.
दरम्यान नव्याने बाधित झालेल्यांपैकी लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली जातं असून 80 टक्के लोक दोन्ही डोस घेतलेली बाधित होताना दिसत असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आढावा बैठकीत सांगितलं आहे.