बेंगळुरू – बेंगळुरू ओपन 2 एटीपी चॅलेंजर स्पर्धेत जागतिक क्रमवारीत 138व्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्झांडर वुकिकशी याला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. या स्पर्धेत भारताच्या प्रजनेश गुणेश्वरनची पहिल्या फेरीत अव्वल मानांकित ॲलेक्झांडरशी लढत होणार आहे. दुसरीकडे रामकुमार रामनाथनची लढत फ्रान्सच्या सातव्या मानांकित मॅथियास बोर्गेशी होणार आहे.
या स्पर्धेत 158व्या क्रमांकावर असलेल्या फ्रेंच खेळाडू ह्यूगो ग्रेनियरला दुसर, तर 161व्या क्रमांकावरील एन्झो कॉंकॉड याला तिसरे मानांकन देण्यात आले. तसेच इटालियन फेडेरिको गायोला चौथे मानांकन मिळाले. या स्पर्धेची पात्रता फेरी रविवार आणि सोमवारी होणार आहेत.
दरम्यान, प्रजनेशला दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित जिरी व्हेसेलीकडून पराभव पत्करावा लागला होता, तर रामकुमारला बेंगळुरू ओपन-1मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स पर्सेलकडून पराभूत पत्करावा लागल्याने पहिल्या फेरीतून बाहेर पडावे लागले होते.