रेडा-लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्यावतीने शेतकरी कर्जमाफी लाभार्थींच्या आधार प्रमाणीकरणाचे शिबिराची सुरुवात नुकतीच करण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमुतीचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांनी केले आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक रेडणी शाखेच्या सहकार्याने लाखेवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्यावतीने शेतकरी सभासदांना मोठ्या प्रमाणात पीककर्ज मुक्तीचा लाभ झाला आहे. या संस्थेतील जवळपास 416 शेतकरी सभासदांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी लाखेवाडी विविध कार्यकारी संस्थेच्यावतीने पात्र लाभार्थींचे आधार कार्ड व बॅंक पासबुक प्रमाणीकरण करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बॅंकेचे विकास अधिकारी यशवंत शिंदे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी विषयी संपूर्ण माहिती सांगितली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पोपट ढोले, उपाध्यक्ष धनंजय गिरमे, बबन खाडे, सखाराम थोरवे, सरपंच सोमनाथ गायकवाड, उपसरपंच सदाशिव बागल, तंटामुक्तीचे अध्यक्ष तुकाराम साबळे, दिलीप नागरगोजे, संदीप साबळे, सहसचिव आबासो खाडे तसेच संस्थेचे सर्व संचालक,ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.