बाली इंडोनेशिया येथून ट्रॅडिशनली बॅलनिज मसाज डिझाईन झाला आहे. हा मसाज शरीरावर संगीतमय लहरींमधून करण्यात येतो. या संगीतमय लहरी म्हणजे हाताचा तळवा ते कोपऱ्यापर्यंतचा भाग वापरून ग्राहकाच्या शरीरावरती वेगवेगळ्या रोलिंग स्ट्रोकिंग टॅपिंग मुव्हमेंट करून एका लईत मसाज केला जातो. मसाज माध्यमांसाठी चाफा जोजोबा कोकोनट वॉटरमेलन अशी ऑइल वापरली जातात.
बॅलनिज मसाज हा शरीरातील स्नायूंना ऊर्जा निर्मितीचे काम करतो, त्याचसोबत शरीरावरील मृत त्वचा हलक्या प्रमाणात कमी करून त्वचेला उजाळा देण्याचे काम करतो. त्यामुळे शारीरिक डिटैनिंग प्रोसिजरमध्ये बॅलनिज मसाज प्रामुख्याने करण्यात येतो. बाहेर फिरायला जातो तेव्हा समुद्राकाठी अथवा पर्यटनासाठी फिरताना काही बॉडी टॅन होते ते कमी करण्यास बॅलनिज मसाज आपल्याला मदतनीस ठरतो. शरीरावरील त्वचेचे रेस्पिरेशन तसेच चयापचय क्रिया सुधारण्यास सुद्धा बॅलनिज मसाज मदतनीस ठरतो. हाताचा तळवा ते कोपऱ्यापर्यंतचा भाग वापरून स्ट्रोकिंग आणि रोलिंग मुव्हमेंट शरीरावर केल्यामुळे शरीरातील स्नायूंमध्ये साठलेले नको असलेले घटक शरीराबाहेर फेकायला मदत करतात. त्यामुळे स्नायूंना खूपच आराम पडतो. त्यामुळे शरीर तजेलदार व त्वचा चमकदार होते. शरीर, शरीरावरील त्वचा टॅन असेल तर बॅलनिज मसाजसोबत राईस रॅप मास्क घेतल्यास स्पा थेरपी प्रभावी ठरू शकते.
थाई मसाज थेरपी…
थायलंडमध्ये प्रामुख्यानं प्रचलित असलेला थाय मसाज हा स्पा थेरपीचा एक प्रकार आहे. थाई मसाजमध्ये काही अंशी थोडे शारीरिक स्ट्रेचिंगचे प्रकार येतात. सोबत मसाजही असतो. त्यामुळे हा मसाज सगळ्यात जास्त मानसिक तणावापासून मुक्तीसाठी तसेच शारीरिक फ्लेक्सिबिलिटी, लवचिकता वाढवण्यासाठी व ज्यांना कंबर दुखी आहे त्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. थाई मसाज थेरपीमध्ये प्रामुख्याने पेपरमेन्ट ऑइल, सिट्रस ओईल, लावेंडर ऑइल या तेलांचा समावेश केला जातो. यापैकी लावेंडर ऑइल मानसिक ताण तणावाला कमी करतं, तर पेपरमेन्ट ऑइल कुलिंग इफेक्ट देतं. कंबरदुखी अथवा डोकेदुखी कमी करण्यास मदत करतो. तर सिट्रस ऑइल अँटीसेप्टिक तसेच एनर्जेटिक इफेक्ट देतो, उत्तेजना वाढवतो. स्नायूंची ताकद वाढवतो. त्वचेला उजाळा देतो. अशा पद्धतीने या तीन तेलांचं कॉम्बिनेशन करून थाई मसाज थेरपी केली जाते. सुरुवातीला शारीरिक स्ट्रेचिंग करून घेऊन पायाच्या मागील भागापासून या मसाज थेरपीला सुरुवात होते.
या थेरपीमध्ये ब्लड सर्क्युलेशनबरोबर लिंफ सर्क्युलेशनसुद्धा योग्य प्रमाणात होण्यास मदत होते. थाई मसाज थेरपीमध्ये ज्या स्ट्रेचिंग योगिक मुव्हमेंट असतात, यामुळे शरीरातील रक्तप्रवाह तसेच लिम्फॅटिक ड्रेनेजच्या हालचाली प्रमाणबद्ध होतात. सुरुवातीला केल्या जाणाऱ्या स्ट्रेचिंग मुव्हमेंट्समुळे शारीरिक सांध्यांची लवचिकता वाढते व नंतर तीन तेलांच्या कॉम्बिनेशन्समुळे शरीरातील स्नायूंमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. मसाज करत असताना स्ट्रेचिंग, स्ट्रोकिंग, रोलिंग, कपिंग, हॅकिंग, पिंचिंग या वेगवेगळ्या मुव्हमेंट केल्या जातात.
काही बैठे खेळ, तसेच खूप प्रवास करणारे, ड्रायव्हिंग जास्त असणाऱ्या, तसेच खूप साऱ्या बैठ्या ऍक्टिव्हिटी करणाऱ्या लोकांसाठी थाय मसाज अतिशय उपयुक्त ठरतो. याचसोबत नेमबाजी, बुद्धिबळ, जिम्नॅस्टिक अशा खेळाच्या खेळाडूंसाठी थाई मसाज थेरपी उपयुक्त ठरते.थाई मसाजचे ट्रॅडिशनल थाई बॉडी मसाज, थाई ऑइल बॉडी मसाज, थाई फूट मसाज व थाई पिंडा बॉडी मसाज असे वेगवेगळे प्रकार आहेत. ट्रॅडिशनल थाई बॉडी मसाज जमिनीवर मॅट टाकून त्यावर ग्राहकास झोपून करण्यात येतो, यामध्ये कोणत्याही तेलाचा वापर केला जात नाही.
शरीरावर व्हायब्रेशन्स हॅकिंग शेकिंग, ट्विस्टिंग, रोलिंग तसेच तळपायाच्या काही मुव्हमेन्ट केल्या जातात. ट्रॅडिशनल थाई मसाजमध्ये हा प्रकार अनुभवला जातो. थाई पिंडा मसाजमध्ये शरीरावर तेल लावून घेऊन, एका पातळ अशा कॉटनच्या कापडाच्या पोटलीमध्ये काही औषधी वनस्पती घेऊन हाताचा तळवा व ही पोटली वापरून एका सरळ दिशेने शरीरावर ठराविक प्रमाणात दाब देऊन मसाज केला जातो. थाई ऑइल बॉडी मसाजमध्ये वर सांगितल्याप्रमाणे तीन तेलांचे कॉम्बिनेशन करून हाताचा तळवा, अंगठा, कोपरा तसेच बोटे यांचा वापर करून शरीरावर ठराविक पद्धतीच्या मुव्हमेंट केल्या जातात. थाई फूट मसाजमध्ये स्पेशलाइज्ड फूट ऑइल वापरली जातात, ठराविक पद्धतीने ऍक्युप्रेशर करून राऊंड शेपची थाई फूट स्टिक वापरून हा मसाज केला जातो.
अशा पद्धतीने स्पा थेरपीमध्ये वेगवेगळ्या मसाज थेरपी त्यांच्या वेगवेगळ्या ट्रॅडिशनल पद्धतीने सुद्धा केल्या जातात.कधी कधी दोन मसाजच कॉम्बिनेशन करूनही काही थेरपी केल्या जातात. योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य पर्यायासाठी कराव्यात. बॅलनिज आणि थाय मसाज थेरपीचे कॉम्बिनेशन केल्यास आपल्याला शरीरावरील टॅन रिमूव्ह करणे तसेच शरीरातील स्नायूंना बळकटी आणणे त्याचबरोबर लवचिकता वाढवणे आणि काही बैठे खेळ तसेच बैठ्या कामांमध्ये असणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त अशी थेरपी करून घेता येते. समाजात कधीकधी काही वेळेस या मसाज थेरपींना रेग्युलर मसाजबरोबर कम्पेअर केले जाते. स्पा थेरपी या अरोमा ऑइल बेस थेरपी असतात, त्याचसोबत त्या विशिष्ट पारंपरिक पद्धतीच्या रचनेनुसार केल्या जातात. त्यासाठी मसाज आर्टिस्टसुद्धा शिक्षित असावे लागतात, सल्ला देणारे तज्ज्ञ जाणकार असावे लागतात. या सगळ्यासाठी काही अंशी काही लोकांना समाजात या थेरपी खूप महाग वाटतात. पण अनेक प्रकारच्या औषधांपेक्षा काहीच स्पा थेरपी आपल्या आरोग्यास खरंच गुणकारी ठरतात. (क्रमशः)