पुणे(प्रतिनिधी) – भातू समाजाच्या जात पंचायतीतून बहिष्कृत करून व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी महिलेने 11 जणांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. संबंधित तक्रारीतून एकाने नाव वगळण्यासाठी तक्रारदार महिलेला साथीदारांच्या मदतीने बेदम माहराण केल्याची घटना धनकवडीत नुकतीच घडली.
रूपेश प्रेम कुंभार (40 ), निखील सुनील वुैंभार (29 ), प्रेम कुंभार (60) , रूबीना सुनील कुंभार (45 ), प्रीती रूपेश कुंभार (37 ) , पिंकी निखील वुैंभार (36 सर्व रा. मोहननगर, धनकवडी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका महिलेने सहकानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सासवडमधील गराडे गावात नोव्हेंबर 2020 मध्ये भातू समाजाची बैठक झाली होती. संबंधित बैठकीत पंचानी फिर्यादी यांच्या परिवाराला एक वर्षासाठी बहिष्कृत करून बैठकीचा व्हिडिओ व्हायरल केला होता. याप्रकरणी फिर्यादी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर 17 जुलैला फिर्यादी आणि त्यांची मुलगी मोहननगरमधील आईला भेटण्यासाठी गेले होते.
त्यावेळी त्यांच्या आईच्या घरासमोर राहणाऱ्या आरोपींनी फिर्यादी यांना जातपंचायत तक्रारीत रूपेश कुंभार यांचे नाव का टाकले. तक्रारीतून रूपेशचे नाव काढून टाक, असे म्हणत तिघीनीही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर इतर आरोपींनी फिर्यादी शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस तपास करीत आहेत.