नवी दिल्ली – देशातील करोना रूग्णांची संख्या आज पुन्हा चाळीस हजारांच्यावर गेली आहे. काल करोना रूग्णांच्या संख्येत 125 दिवसांची नीचांकी नोंद झाल्यानंतर गेल्या 24 तासांत देशात 42 हजार 15 करोना रूग्ण आढळून आले आहेत.
दरम्यानच्या काळात देशातील ऍक्टिव्ह रूग्णांची संख्या 4 लाख 7 हजार 170 इतकी झाली असून हे प्रमाण एकूण रूग्णांच्या 1.30 टक्के इतके आहे. गेल्या 24 तासांतील पॉझिटीव्हीटी रेट 2.27 टक्क्यांवर गेला आहे.
गेल्या 24 तासांत करोनाचे 3998 रूग्ण दगावले असून यात सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे असे सांगण्यात येत आहे. या नव्या संख्येमुळे देशातील एकूण करोना मृतांची संख्या आता 4 लाख 18 हजार 480 इतकी झाली आहे.
दरम्यान लसींचा किमान एक डोस घेतलेल्यांची संख्या आता 41 कोटी 54 लाख इतकी झाली आहे.