‘नको त्या अवस्थेत चित्रिकरण करणाऱ्या दोघांना पकडले अन्…’ – वाचा राज कुंद्रापर्यंत धागेदोरे पोलिसांनी कसे उलगडले

मुंबई – मुंबई पोलिसांना चार फेब्रुवारीला मढ आयलंडवर एका बंगल्यात पॉर्न चित्रपटाचे शुटींग सुरू असल्याचा फोन आला होता. पोलिसांनी तातडीने धाड टाकली. नको त्या अवस्थेत चित्रिकरण करणाऱ्या दोघांना त्यावेळी पकडण्यात आले.

या चित्रिकरणासाठी मदत करणाऱ्या पाच जणांना त्यावेळी अटक करण्यात आली आणि एका महिलेची सुटका करण्यात आली. त्या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि त्याचा शेवट उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा यांना 19 जुलै अटक करण्यात आली.

काही मोबाईल ऍप्लिकेशनच्या सहाय्याने बनवलेल्या या पॉर्न फिल्म वितरीत करणाऱ्या कुंद्राला न्यायालयाने 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. बीड अथवा झारखंडसारख्या मागास भागातून अभिनेत्री बनण्यासाठी मायानगरी मुंबईत आलेल्या मुलींना हेरण्यात यायचे आणि त्यांना वेब सिरिजमध्ये काम देण्याच्या बहाण्याने बोलावण्यात येई. प्रत्यक्ष चित्रिकरणाच्या दिवशी त्यांना अचानक स्क्रिप्टमध्ये बदल केल्याचे सांगण्यात येई. तेथे त्यांना कपडे उतरवण्यास आणि उत्तेजक दृष्ये करण्यास भाग पाडले जाई.

या महिलांनी त्यास नकार दिल्यास त्यांना शुटींगसाठी झालेला सगळा खर्च देण्याचे दडपण आणले जाई. त्यामुळे गरीब महिलांना सांगतील ते करण्यावाचून पर्याय रहात नसे. हे चित्रीकरण केल्यानंतर हॉटहिट मुव्ही आणि हॉटस्पॉट सारख्या मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये भरत. त्याचे ओटीटी प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शन देण्यात येई. तसेच समाज माध्यमांत टाकून त्यावर जाहिरातीही मिळवत असत.

पोर्नोग्राफी पिक्‍चर दाखवले जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर ऍपल स्टोअरमधून जून 2020 मध्ये आणि गुगल स्टोअरमधून नोव्हेंबर 2020 मध्ये हॉटस्पॉट हे ऍप हटवण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

मढसारख्या मुंबईतील उपनगरांमध्ये भाड्याने घेतलेल्या बंगल्यावर हे प्रौढांसाठीचे चित्रपट एका दिवसांत चित्रीत केले जात असत. पाच ते सहा कर्मचाऱ्याचे पथक असे. त्यात दिगदर्शक, संवाद लेखक, लोकेशन शोधणारे आणि वेब ऍप डेव्हलपरचा समावेश असे. लॉकडाऊनमध्ये ही ऍप लोकप्रिय ठरली होती. त्यांचे सबस्क्राइबर लाखाच्या घरात होते, असे पोलिस तपासांत स्पष्ट झाले आहे.

सुरवातीला मुंबई पोलिसांचा रोख निर्माते आणि चित्रिकरणासाठी मदत करणाऱ्यांवर होता. त्यात अशा चित्रपटांचा निर्माता रोवा खान आणि काही काळ अभिनय केलेला गेन्हा वसिष्ठ यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे.

त्यानंतर गुन्हेशाखेने अशी फिल्म विकणाऱ्या प्लॅटफॉर्मवर आपले लक्ष केंद्रीत केले. त्यात हॉटस्पॉट ऍपची मालकी असणाऱ्या इंग्लंडस्थित केन्‍रीन प्रा. लि.शी संबंधित असणाऱ्या उमेश कामतला अटक केली. कामतची चौकशी आणि त्याच्या कॉल रेकॉर्डवरून पोलिसांना आढळले की केन्‍रिनच्या मालकीचे ऍप कुंद्रा त्याच्या मुंबईतील विआन इंडस्ट्रिजद्वारा चालवत होता. मात्र एप्रिल महिन्यात दाखल केलेल्या आरोप पत्रात कुंद्राचा उल्लेख नव्हता.

तपासाच्या पुढील टप्प्यात कामतच्या लॅपटॉपमधील टेक्‍निकल डाटा तपासला. त्यानंतर न्यायालयाकडे कुंद्राच्या कार्यालयाची तपासणी करण्याची न्यायालयाकडे परवानगी मागितली. पोलिसांनी तेथे छापा टाकल्यानंतर त्यांना एवढे पुरावे आढळले की त्यांनी त्याला रात्री उशीरा अटक केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.