पिंपरी – घरात येऊ दिले नाही, या कारणावरून तीन जणांनी मिळून दोन तरुणांना लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
पिंपरी येथे मंगळवारी (दि. 26) दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली.धिरेन मानस काळे (वय 35, रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी बुधवारी (दि. 27) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शरीफ पवार (वय 30), बाका उर्फ दिनेश निलेश काळे (वय 25, दोघे रा. गांधीनगर, देहूरोड), बंटी काळे (वय 22, रा. रामनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी धिरेन व आरोपींमध्ये किरकोळ कारणावरून वाद होते. यातून आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण केली.