मुंबई – नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळेही लोकांच्या मनावर राज्य करायची. आजही करिश्माने फॅनफॉलोविंग प्रचंड आहे. त्यामुळे तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट नेहमीच प्रचंड व्हायरल होतात.नुकतंच करिश्माने आपल्या इंस्टाग्रामवर आपला एक बोल्ड फोटो शेअर केल्याने चाहते देखील अवाक झाले आहेत.
करिश्माने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. राजा हिंदुस्थानी या चित्रपटात आमिर खानसोबत सर्वात लॉंग टाइम किसिंग सिन देऊन करिश्माने बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती. आता देखील तसेच काहीसे झाले आहे. सिनेसृष्टीपासून दूर असलेली करिश्मा सहसा सोशल मीडियावर आपल्या फॅमिली रिलेटेड अपडेट शेअर करताना दिसते. मात्र यावेळी करिश्माने शेअर केलेला फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.
वयाच्या 48 व्या वर्षी करिश्मा कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केल्याने चाहत्यांचे होश उडाले आहेत. करिश्मा कपूरने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती निळ्या आणि काळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. या फोटोमध्ये करिश्मा बीचवर असल्याचे समजते. फोटोवरून करिश्मा सध्या कुठेतरी व्हेकेशन एन्जॉय करत असल्याचे समजते.
करिश्मा कपूरचा हा फोटो खूप पसंत केला जात आहे. फोटोमधला करिश्माचा बोल्डनेस हा चर्चेचा खास विषय आहे, याशिवाय या फोटोत असे काही टिपले आहे जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये करिश्मा सेल्फी घेत असताना तिच्या मागे असलेल्या झुल्यावर कोणीतरी कैद झाले आहे. हे दुसरे तिसरे कोणी नसून तिची बहीण करीन कपूर असल्याचे समजते. करिश्माने फोटोकॅप्शनमध्ये देखील तिचा उल्लेख केला आहे. करिश्माचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय.