Karishma Kapoor | Kareena Kapoor| Eknath Shinde : अभिनेता गोविंदा आहुजा यांनी आज गुरुवारी (दि. 28) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी भगवा झेंडा हातात देत गोविंदाचे पक्षात स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.
यावेळी बोलताना गोविंदा म्हणाले की, “पुन्हा राजकारणात येईल असं वाटलं नव्हतं. 14 वर्षांनंतर पुन्हा राजकीय प्रवासाला सुरुवात होत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईचा विकास झाला आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार, अशी प्रतिक्रिया गोविंदा यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांचे आभारही मानले.। Karishma Kapoor | Kareena Kapoor| Eknath Shinde
महायुतीमध्ये भाजपने आपल्या 24 उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत. तर अजित पवार यांनी देखील दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीने अद्याप एकही अधिकृत उमेदवार घोषित केलेला नाही. अभिनेता गोविंदा आहुजा यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.
कपूर सिस्टर्स मुख्यमंत्र्यांच्या भेटीला –
दरम्यान, याच बरोबर आज अभिनेत्रीकरीना कपूर आणि करिश्मा कपूर या दोन बहिणींनी देखील एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. शिवसेनेकडून नुकतंच स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली होती.
यामध्ये 40 स्टार प्रचारक नेत्यांची नावे होती. यानंतर आता बॉलिवूडमधील कलाकारांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर त्यांची देखील स्टार प्रचारक म्हणून घोषणा होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मात्र, मिळालेल्या माहितीनुर फक्त करिष्मा कपूर मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. आज संध्याकाळी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याचं बोललं जात आहे. करिष्मा शिंदे गटाची स्टार प्रचारक म्हणून दिसण्याची शक्यता आहे. । Karishma Kapoor | Kareena Kapoor| Eknath Shinde