Karishma kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही तिच्या अभिनयाचे अनेकजण चाहते आहेत. नुकतेच करिश्मा कपूर हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये गेली होती. तिथे ‘हार्वर्ड इंडिया कॉन्फरन्स’मध्ये तिने सहभाग घेतला होता. करिश्माची बहीण करीनाने देखील काही वेळासाठी व्हिडिओ कॉलद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. याचे काही फोटो करिश्माने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु करिश्माच्या पोस्टवरून तिला ट्रोल केले जात आहे.
करिश्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या इव्हेंटचे काही फोटोज शेअर केले आहेत. मात्र नेटकऱ्यांनी करिश्माला तिच्या शिक्षणावरून ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, करिश्मा कपूरने पदवीचं शिक्षण घेतलेले नाही. तिने केवळ १२वी पर्यंतच शिक्षण घेतलं आहे. पुढे तिने पदवीसाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला परंतु चित्रपटात पदार्पण केल्यानंतर तिने कॉलेजचं शिक्षण अर्धवटच सोडून दिले. यामुळे तिला आता नेटकरी ट्रोल करत आहेत.
Standard of Harvard university that they called Karisma Kapoor as speaker 🙄
A Bollywood actress who is not even a graduate 🙄🙄 pic.twitter.com/mJAfqlLESn— Sheetal Chopra 🇮🇳 (@SheetalPronamo) February 27, 2024
एका युझरने करिश्माचा हार्वर्डमधील फोटो शेअर करत लिहिलं, “हार्वर्ड यूनिवर्सिटीची पातळी एवढी खाली गेली आहे की त्यांनी करिश्मा कपूरला भाषण द्यायला बोलावले. एक अशी बॉलिवूड अभिनेत्री जी पदवीधरही नाही.” तर काहींनी करिश्माची बाजू घेत तिला पाठिंबा दिला आहे. “माणसाकडे असलेलं ज्ञान हे कोणत्याही डिग्रीपेक्षा श्रेष्ठ आहे. करिश्मा त्याकाळातील एक उत्कृष्ट अभिनेत्री होती,” असे एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले आहे.
दरम्यान, करिश्मा कपूर शेवटची 2012 मध्ये ‘डेंजरस इश्क’ चित्रपटात दिसली होती. यानंतर 2013 मध्ये ‘बॉम्बे टॉकीज’ आणि 2018 मध्ये ‘झिरो’ या चित्रपटात त्याचा कॅमिओ दिसला होता. यावर्षी करिश्मा कपूर ‘मर्डर मुबारक’ नावाच्या चित्रपटात सारा अली खान, पंकज त्रिपाठी आणि विजय वर्मासोबत दिसणार आहे. याशिवाय ती ‘ब्राऊन’ नावाच्या वेब सीरिजमध्येही काम करत आहे.