पुणे – चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या बावधन, सूस, पिरंगुट नंतर पौड, कोळवण व माले अशा तीन ठिकाणी नवीन शाळेचे उद्घाटन करण्यात आले. मुळशी मधील एक अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून ज्याचे नावलौकिक आहे. अशा पेरिविंकलच्या आता 6 शाखा आहेत. मुळशी मधील 6 शाखा असलेली एकमेव शिक्षण संस्था म्हणजे पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल ज्याचे उद्दिष्ट गावातील मुलांना इंग्रजी माध्यमातून उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे हे असून त्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल सर यांच्या प्रयत्नांनी मुळशीमध्ये अल्प काळात 6 शाखा काढून हे उद्दिष्ट पूर्णत्वाला नेले आहे. आता पुढील वाटचाल ही विद्यापीठाकडे असून येत्या पाच वर्षात विद्यापीठ प्रस्थापित असेल असे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र बांदल सर यांनी सांगितले.
यासाठीच बावधन, पिरंगुट व सूस नंतर मंगळवार दि. 13/6/23 रोजी पौड येथील भव्य शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न होऊन लगेच दुसऱ्याच दिवशी बुधवार दि.14 जून 2023 रोजी कोळवन व माले या 2 ठिकाणी एकाच दिवशी नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी पौड शाखेचे उद्घाटन नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ व महसूल नायब तहसीलदार अमित कदम, माजी सभापती लक्ष्मी सातपुते, पौड सरपंच अजय कडू संतोष सातपुते, पौडचे माजी सरपंच जगदीश लांडगे, रिपाईचे नेते उमेश कांबळे, विजय दगडे,यांच्या हस्ते करण्यात आले.
तर कोळवण शाखेचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस कोळवन गण अध्यक्ष बबन भाऊ धिडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपट भाऊ दुडे ,माजी सरपंच अशोक साठे ,कोळवणच्या सरपंच धनश्री पालकर,भलगुडि सरपंच वनिता साठे, संगीत स्वर सम्राज्ञ सोमनाथ महाराज, चक्री संगीत मृदंगमणी वैभव महाराज, कोळवन गण अध्यक्ष भरत सातपुते, ग्रामसेवक गजानन जाधव, सह्याद्री ग्रुप अध्यक्ष हरिभाऊ धिडे, सरपंच साहदु साठे, वि. वि. का.सो. भालगुडी सदस्य वाघू साठे, स्व.नारायण देव विश्वस्त भालगुडी दशरथ भिलारे माजी सरपंच भाऊ क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच माले शाखेचे उद्घाटन उद्योजक रमेश जोरी, उद्योजक पंढरीनाथ जोरी, माजी सरपंच विजय दळवी, युवा नेते सुहास शेंडे, युवा नेते निलेश जाधव, धोंडीबा गोरे पासलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, यश बांदल सूस शाखेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित, पिरंगुटचे मुख्याध्यापक अभिजित टकले, आंतरराष्ट्रीय पत्रकार संजय दुधाणे, दिनेश कंधारे,दीपक कंधारे, पौडच्या इँचार्ज जिनी नायर, पूनम पांढरे, कोलवाणच्या इंचार्ज मयुरी, मालेच्या इंचार्ज श्रुतीका, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ला पाटील व रुचा हल्लूर यांनी केले.