कोलकाता: देशात करोनाची लाट सुरु असतानाच दुसरे संकट आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले आहे. करोनातून बरे होणाऱ्या रुग्णात ‘ब्लॅक फंगस’ चा आजार वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, आता या ‘ब्लॅक फंगस’ मुळे कोलकात्यातील एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक ‘घटना समोर आली आहे.
‘ब्लॅक फंगस’मुळे शम्पा चक्रवर्ती नावाच्या 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. अलीकडेच त्यांना करोनाची लागण झाल्याने शंभूनाथ पंडित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाचे उपचार सुरु असतानाच त्यांना म्युकर मायकोसिसचा संसर्ग झाला. दरम्यान म्युकर मायकोसिस म्हणजेच ‘ब्लॅक फंगस’वरील उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला
गुरुवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. करोना आणि काळ्या बुरशीमुळे कोलकातामध्ये झालेला हा पहिला मृत्यू आहे. ही महिला मधुमेहाने ग्रस्त असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्यांना ऑक्सिजनही लावण्यात आले होते. करोना उपचाराबरोबरच, ‘ब्लॅक फंगस’चे देखील त्यांच्यावर उपचार केले गेले.